
चिंतेने, अस्वस्थतेने ग्रासून टाकलंय?
बातम्या, समाजमाध्यमं, ईमेल्स आणि टेक्स्ट मेसेज यांच्या अव्याहत चक्रामधून बाहेर येत दोन क्षण विश्रांती कधी आणि कशी घ्यायची हे समजत नाहीये?
प्रसिद्ध झेन भिक्खू, शुनम्यो मसुनो या पुस्तकातून आपल्याला महत्त्वाचा संदेश देतात – कधीकधी तुम्ही काहीही न करणं हीदेखील सर्वोत्तम कृती असू शकते.
पुस्तकातील 99 उपयुक्त टिप्स, धडे आणि विचारप्रवर्तक सत्य जाणून घेतल्यास, तुमच्या आयुष्यातला ताण कसा कमी करायचा हे समजून घेण्यात मदत होईल, तसंच नाही म्हणण्याची कला आणि तुम्हाला काही गोष्टी जमू शकत नाही हे स्वीकारणं हे कसं साध्य करायचं हेही समजेल. समाजमाध्यमं ही साधनं आहेत बाकी काही नाही, दिवसाच्या उजेडात महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत आणि जितके तुम्ही व्यग्र असाल, तितके लहान-लहान ब्रेक घेणं महत्त्वाचं का असतं, हेही तुमच्या लक्षात येईल.
Imprint: Penguin Swadesh
Published: Jun/2025
ISBN: 9780143471134
Length : 224 Pages
MRP : ₹399.00