
‘काय हवं आहे?’
टोकियोच्या समंजस ग्रंथपाल हा प्रश्न विचारतात.
ग्रंथालयात येणारी प्रत्येक व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, तिला नेमकं काय हवं आहे, हे सायूरी कोमाचीना न सांगता समजतं. आणि तिचा शोध सफल व्हावा, ह्यासाठी त्या योग्य पुस्तकाची शिफारस करतात.
अस्वस्थ विक्रेता साहाय्यकाला नवी कौशल्यं शिकायची आहेत. बाळंतपणाच्या रजेनंतर कामावर रुजू झालेली आई पदावनतीमुळं आलेल्या नैराश्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे. प्रामाणिक लेखापालाला पुरातन वस्तूंचं दुकान उघडायची तळमळ आहे. अलीकडेच निवृत्त झालेला कर्मचारी आयुष्याचा नवा अर्थ शोधत आहे.
ह्या प्रत्येकाला कोमाचींनी सुचवलेल्या विलक्षण पुस्तकामध्ये आपली स्वप्नं साकार करण्याचे मार्ग सापडतात.
‘तुम्ही जे शोधत आहात, ते ग्रंथालयात मिळेल’ हे पुस्तक ग्रंथालयांची अद्भुत दुनिया आणि परस्परसंबंधांची जाणीव ह्याविषयी आहे. हृदयाची धडधड काय सांगते हे लक्षपूर्वक ऐकलं, समोरून आलेली संधी सोडली नाही आणि मनमोकळेपणानं बोललात, तर तुम्ही दीर्घकाळ पाहिलेली स्वप्नं साकार होतील असं सांगणाऱ्या प्रेरणादायी कहाण्या ह्या पुस्तकात वाचायला मिळतील.
Imprint: Penguin Swadesh
Published: Dec/2025
ISBN: 9780143477051
Length : 280 Pages
MRP : ₹399.00